ब्रेकिंग

*मविप्रच्या गुणवंतांना दरवर्षी मिळणार ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ पुरस्कार*

*गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ सभासद शिवाजीराव शेटे यांचे २ लाख ५१ हजारांचे दातृत्व*

*मविप्रच्या गुणवंतांना दरवर्षी मिळणार ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ पुरस्कार*

——————————–

*गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ सभासद शिवाजीराव शेटे यांचे २ लाख ५१ हजारांचे दातृत्व*

——————————–

*नाशिक :* विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक तथा मविप्रचे खेडगाव येथील ज्येष्ठ सभासद शिवाजीराव नामदेव शेटे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांचा देणगी स्वरूपातील धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या दातृत्वातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शिवाजीराव शेटे यांनी दिलेली देणगीची रक्कम संस्थेने बँकेत ठेव स्वरूपात ठेवावी आणि त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी मविप्रच्या विविध महाविद्यालयांमधून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रोख स्वरूपात ‘रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील’ यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या देणगीतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रेरणाही मिळणार आहे.

शिवाजीराव शेटे यांनी गुरुवार, दि. ८ रोजी मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात मविप्र समाजाच्या महिला संचालक शालिनीताई सोनवणे यांच्याकडे देणगीच्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मविप्रचे संचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते शिवाजीराव शेटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे शिक्षणाधिकारी भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. कैलास शिंदे, प्रा. शशिकांत मोगल, तसेच पिंपळगावचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, प्रा. सुभाष जयपूरकर, प्रा. अशोक सोनवणे, सभासद अशोकराव कुंदे, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

शिवाजीराव शेटे यांच्या या शैक्षणिक दातृत्वाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळाने त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले हे योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

———————————-

*नाशिक : मविप्रच्या संचालक शालिनीताई सोनवणे यांच्याकडे देणगीच्या रकमेचा धनादेश सुपूर्द करताना ज्येष्ठ सभासद शिवाजीराव नामदेव शेटे. समवेत मविप्रचे संचालक प्रवीण जाधव, शिक्षणाधिकारी भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. कैलास शिंदे, प्रा. शशिकांत मोगल, तसेच उपनगराध्यक्ष सतीश मोरे, प्रा. सुभाष जयपूरकर, प्रा. अशोक सोनवणे, अशोकराव कुंदे, सुनील जाधव.*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे