कालिका माता यात्रा परिसरात पार्किंग केलेल्या कारमधून एक लाखाची चोरी
कार उघडून चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी, नाशिक जन्मत नाशिक शहरातील ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथे यात्रा उत्सव चालू आहे दररोजचे हजारो भाविक दर्शनासाठी या परिसरात येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्या परिसरात गर्दी वाढलेली आहे या गरजेचा फायदा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असला तरी देखील चोरटे घेत असल्याचे दिसून आले आहे काल
दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाच्या उभ्या कारमधून अज्ञात संशयिताने एक लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. यात्रोत्सवाच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. तसेच वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्तही असतो. अशा गर्दीच्या वातावरणात ही चोरी झाल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
म्हसरूळ परिसरातील रहिवासी कन्व विनय अहिरे (वय २१) हा तरुण सोमवारी (दि. १२) सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास
त्याने सायंकाळी सुमारे आयकर भवनासमोरील रस्त्यावर कार उभी केली. दर्शनासाठी जाण्याच्या घाईगडबडीत कारची चावी गाडीतच राहिल्याचे अहिरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते तत्काळ कारजवळ परत आले. त्या वेळी कारचे दरवाजे बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी कार उघडून पाहणी केली असता, कारच्या हॅन्डरेस्ट बॉक्समध्ये ठेवलेले सात हजार रुपये आणि मधल्या सीटवरील
बॅगेत ठेवलेले ९३ हजार रुपये अशी एकूण एक लाखांची रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यात्रोत्सवामुळे परिसरात भाविकांची वर्दळ, वाहनांची गर्दी आणि गडबड मोठ्या प्रमाणावर होती. या परिस्थितीचा तसेच कारची चावी गाडीत राहिल्याचा गैरफायदा घेत अज्ञात संशयिताने ही रक्कम लांबवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अहिरे यांनी परिसरात शोध घेतला; मात्र रक्कम मिळू शकली नाही. त्यानंतर कन्व अहिरे यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२)
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी वाहनांत मौल्यवान वस्तू किंवा रक्कम न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या परिसरात लक्ष ठेवून चोरट्यांना गजाआड करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे.



