कुंभमेळ्याच्या विकास कामामुळे नाशिक व त्रंबकेश्वर नवीन चेहरा मोरा घेऊन येणार.
कुंभमेळ्याच्या विकास कामांमध्ये स्वतः मुख्यमंत्री ठेवणार लक्ष. विकास कामांची केली पाहणी

प्रतिनिधी |
नाशिक जन्मत कुंभमेळ्याच्या विकास कामामुळे नाशिक शहर व त्रंबकेश्वर चा नवीन चेहरा जगापुढे येणार आहे. अनेक सुख सोयीने नाशिक व त्रंबकेश्वर जगासमोर येणार आहे कुंभमेळ्यानंतरही पुढील चाळीस वर्ष शहरातील रस्ते पाणीपुरवठा इत्यादी चांगल्या सेवा टिकून राहतील असे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे केवळ सोहळ्यापुरती मर्यादित नसून, पुढील २५ ते ३० वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया ठरणार आहेत. या कामांमुळे दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी रविवारी दिले.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरमधील सोहळ्यापुरती व गोदाघाट, नाशिकमधील द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळ येथील विकासकामांची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यःस्थिती आणि नियोजनाची
माहिती घेत त्यांनी कामांना गती देण्यास सांगितले.
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तर द्वारका सर्कलवर वाहतूक आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. द्वारका सर्कल येथे यंदाच्या पावसाळ्यात निचऱ्याची चाचणी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केल्याचेही त्यांनी सांगितले. ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा व पोलिस प्रशासनासह विविध यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर, प्रा. देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



