ब्रेकिंग

नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी कोमल प्रताप मेहरोलीया  व उपसभापती पदासाठी चित्रा जगन्नाथ तांदळे.

 

 

 

नाशिक जन्मत   नाशिक महानगरपालिकेच्या २ विशेष समित्यांच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी कोमल प्रताप मेहरोलीया

व उपसभापती पदासाठी चित्रा जगन्नाथ तांदळे तसेच शिक्षण समिती सभापती पदासाठी शरद द्रौपदा चिंतामण मोरे व उपसभापती सोनाली तुषार भंदुरे यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांनी केली व दोन्ही समित्यांच्या नवनियुक्त सभापती व उपसभापती यांना प्रमाणपत्र दिले व सत्कार केला.

नवनियुक्त महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कोमल प्रताप मेहरोलीया व उपसभापती चित्रा जगन्नाथ तांदळे यांचा व

 

शिक्षण समिती सभापती शरद द्रौपदा चिंतामण मोरे व उपसभापती सोनाली तुषार भंदुरे यांचा सत्कार महापौर हिमगौरी आहेर -आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते शाम बडोदे, सीमा ठाकरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांनी केला.

ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे