ब्रेकिंग

जिनी वाह परिषदेसाठी नाशिकच्या महापौरांची निवड.

प्रतिनिधी

नाशिक जन्मतl

सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीतून आकार घेत असलेले नाशिकचे ‘शाश्वत शहर’ मॉडेल आता संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडले जाणार आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांची १२ व १३ ऑक्टोबरला जिनिव्हात होणाऱ्या सहाव्या ‘यूएन फोरम ऑफ मेयर्स’साठी उपस्थित महापौर म्हणून नोंद झाली आहे. ‘सस्टेनेबल फ्युचर’ या संकल्पनेवरील मंचात शाश्वत शहरी विकास, नवकल्पना आणि एसडीजी-११च्या स्थानिक अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे.

नाशिकसाठी या सहभागाचा मुख्य संदर्

कुंभ २०२७ हा आहे. २०१५च्या कुंभमध्ये सुमारे २.५ कोटी भाविक आले होते, तर २०२७साठी १२ कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, पाणी, मलनिस्सारण, नदी संवर्धन, आरोग्य, कचरा व आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यांपूर्वी पाणी, मलनिस्सारण, पावसाचे पाणी, वीज, गॅस व फायबरच्या भूमिगत सुविधा एकत्रित करण्यावर भर दिला आहे. २८ प्रमुख रस्त्यांचे सुमारे १५० किमी काम मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी सुमारे १,२७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे