ब्रेकिंग

मनपा शाळा क्र. १० पंचवटी येथे केंद्र क्रमांक 1 अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ‘संसाधन कक्षा’चे शानदार उद्घाटन..

 

*मनपा शाळा क्र. १० पंचवटी येथे केंद्र क्रमांक 1 अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ‘संसाधन कक्षा’चे (Resource Room) शानदार उद्घाटन..*

*रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटी व किरण कदम फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष उपक्रम..*

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी *मा. डॉ. मिता चौधरी* यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली केंद्र क्र. १, पंचवटी अंतर्गत शिकणाऱ्या सर्व दिव्यांग (विशेष गरजा असणाऱ्या) बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, दर्जेदार शिक्षणासाठी तसेच पालकांच्या योग्य समुपदेशनासाठी मनपा शाळा क्र. १०, पंचवटी येथे अद्ययावत *’दिव्यांग विद्यार्थी संसाधन कक्ष’ (Resource Room)* साकारण्यात आला आहे. या नवनिर्मित कक्षाचा छोटेखाणी उद्घाटन दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सदर उपक्रमाचे आयोजन *’रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटी’* यांच्या वतीने तर संपूर्ण प्रकल्पाला आर्थिक सहाय्य *किरण कदम फाउंडेशन* मार्फत करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री. गुरुमित बग्गा, *रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीच्या अध्यक्षा रो. जयश्री पाटील, किरण कदम फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. पूनम कदम, सचिव रो. कौस्तुभ महाजन, उपाध्यक्ष, रो. अमित घराटे*, मेडिकल डायरेक्टर *रो. शेफाली अगरवाल* नॉन-मेडिकल डायरेक्टर *रो. मेधा पुणतांबेकर*, मेंबरशिप डायरेक्टर *रो. जयंत खैरनार*, न्यू जनरेशन डायरेक्टर *रो. अलका खैरनार* उपस्थित होते. तसेच याशिवाय ‘किरण कदम फाउंडेशन’चे सदस्य *श्री. सागर मोरे, श्री. तुकाराम मुठाळ, कु. तेजस्विनी पाटील* व त्यांचा मित्र परिवार आवर्जून उपस्थित होता. पंचवटी केंद्रातील पर्यवेक्षिका *सौ. राजश्री सोनेरी, श्री. ईश्वर शिरोळे, श्रीम. वंदना पवार* यांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी शिक्षण विभागाच्या या समावेशक शिक्षण (Inclusive Education) उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा कक्ष अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संसाधन कक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बालकांसाठी विविध प्रकारच्या थेरपी, विशेष अध्यापन, पालक मार्गदर्शन आणि नियमित समुपदेशन अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यापुढे या संसाधन कक्षाचे संपूर्ण कामकाज समन्वयक म्हणून *श्री. प्रल्हाद हंकारे (विशेष शिक्षक)* हे पाहणार आहेत. त्यांनी या संसाधन कक्षाच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.

 

कार्यक्रमाचे नेटके *सूत्रसंचालन श्रीम. दिपाली रायते* यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी मनपा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे