दारू का प्याला हे विचारतात आईचा खून. नाशिक मधील गंगापूर भागातील घटना
आरोपी मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात.

नाशकातील घटना; धारधार शस्त्राने केले वार
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत दारूच्या आहारी जाऊन आपल्या जन्मदात्या आईलाच संपवणाऱ्या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना गंगापूर भागातील शिवाजीनगर भागात घडली.
दारू पिऊन आल्याचा जाब – विचारल्याच्या रागातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी गंगापूरमधील शिवाजीनगर येथे घडली. कमलाबाई अनाजी वळवी (७०) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित मुलगा तानाजी वळवी (४०) याला ताब्यात घेतले आहे. तानाजीला दारूचे व्यसन आहे. रात्री तो नशेत घरी आल्यावर आईने जाब विचारल्याने भांडण झाले
संतापात तानाजीने आईवर चाकूने वार केले. कमलाबाईंचा जागीच मृत्यू झाला. रात्री आरडाओरड ऐकूनही रोजचीच भांडणे समजून शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी कमलाबाई बाहेर न आल्याने शेजारी घरी गेल्याने खून उघडकीस आला. तानाजीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक शहरामध्ये अवैधधंदे चा सुळसुळाट झाला असून तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. दारू जुगार इत्यादी अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी नागरिक करत आहे


