उड्डाणपुलावरून उतरताना ट्रकची दुचाकीला धडक, तरुण जागीच ठार
गणपती आगमनाच्या दिवशीच काळाचा घाला
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत काल नाशिक शहरात पाच जणांचा बळी गेलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये अपघाताच्या संख्येत वाढ झालेली आहे. काल गणेश चतुर्थी होती आणि अनेक घरांमध्ये आनंदाचे वातावरण असताना पिंपळगाव बसवंत येथील किरण चांगदेव नरोडे या युवकाचे अपघाती निधन झाले. पुलावरून खाली उतरत असताना ट्रकने धडक दिल्याने दुचाकी वरील युवक किरण खाली फेकले गेले डोक्यात हेल्मेट होते परंतु ते बाजूला पडले याचवेळी ट्रकचे चार डोक्यावरून गेल्याने त्यांचे निधन झाले ही बातमी ज्यांच्या आई-वडिलांना कळवल्यावर घरात शोक मग्न वातावरण झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
घरोघरी गणरायाचे उत्साहात स्वागत होत असताना ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ४.४५ वाजता प्रकाश पेट्रोलपंपाच्या पुढे हा अपघात झाला. किरण चांगदेव नरोडे (३३, रा. पिंपळगाव बसवंत) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण अंबड येथे एका कंपनीमध्ये कामाला होता. चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता तो दुचाकीने (क्र. एमएच १५ जीडी १३९७) गोविंदनगर बोगदा येथील डाऊन रॅम्पवरून खाली समांतर रस्त्यावर उतरला. येथून मुंबईनाक्याकडे जाताना ट्रकची दुचाकीला जोरदार धडक
तरुणाने हेल्मेट घातले होते. मात्र, रस्त्यावर आदळल्यानंतर हेल्मेट डोक्यातून निघून गेले. त्याच क्षणी ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईनाका येथील कंपनीच्या ऑफिसमध्ये जात असताना काळाने घाला घातला.
पोलिसांनी आई-वडिलांना कळवले. कर्ता मुलगा गेल्याने आई-वडील सुन्न झाले. सिव्हिलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. गणेश चतुर्थीच्या दिवशीच अपघातात कर्ता मुलगा गमावल्याने आई-वडिलांनी आक्रोश केला. तो पाहून उपस्थितांचे मन हेलावले.
बसली. यात दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर फेकला गेला अन् पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. शहरात गेल्या महिनाभरात अशा घटनांची पुनरावृत्ती वाढल्याने वाहनचालकांमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी रोष वाढला आहे. रस्त्यावर टोल भरून देखील व रोड टॅक्स भरून वाहतूकदारांना चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांचा प्रशासनाविरुद्ध रोश वाढलेला आहे..



