ब्रेकिंग

ठाणगावात आदर्श गणेशोत्सव – वंजारी समाजाचा स्तुत्य निर्णय, तेली बांधवांकडूनही अनुकरण*

 

*ठाणगावात आदर्श गणेशोत्सव – वंजारी समाजाचा स्तुत्य निर्णय, तेली बांधवांकडूनही अनुकरण*

 

*ठाणगाव -* नाशिक जन्मत   ठाणगाव स्टॅन्ड वर वंजारी समाजाच्या गणपती स्थापनेपूर्वी एक ऐतिहासिक आणि आदर्श निर्णय घेण्यात आला, ज्याची चर्चा आज संपूर्ण परिसरात होत आहे.

 

गणपती स्थापनेच्या वेळी कुठलाही डी.जे. लावायचा नाही, धांगडधिंगा होईल असे कोणतेही वाद्य वाजवायचे नाही, ज्यामुळे कुठल्याही बांधवांना त्रास होणार नाही आणि कोणीही दारू पिऊन नाचणार नाही, अशा स्पष्ट सूचना वंजारी समाजाचे भूषण *श्री. भरत आंधळे साहेब* यांनी दिल्या.

 

वंजारी समाज हा आंधळे साहेबांच्या शब्दाबाहेर कधीच नसतो. त्यामुळे साहेबांच्या या शब्दाचे सर्व समाज बांधवांनी स्वागत केले आणि यंदा कोणतीही मिरवणूक न काढता, गणपतीची स्थापना अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे एकमुखाने ठरविण्यात आले.

 

हा चांगला संदेश ठाणगावच्या तेली बांधवांच्या कानावर जाताच त्यांनी तात्काळ देवी मंदिर, ठाणगाव येथे बैठक घेतली. या बैठकीत अतिशय चांगले विषय मांडण्यात आले आणि आम्ही देखील गणपती स्थापना वेळी कुठलीही डी.जे., धांगडधिंगा होईल असे वाद्य वाजविणार नाही, सक्तीने वर्गणी घेणार नाही आणि मिरवणूक काढणार नाही असा निर्णय घेऊन, एकदम कोणताही गाजावाजा न करता शांततेत गणरायाची स्थापना करण्यात आली.

 

दोन्ही समाजांनी दाखवलेल्या या एकोप्यामुळे आजूबाजूच्या गावात या गणपती स्थापनेची अतिशय चांगली चर्चा ऐकायला मिळत आहे.

 

फक्त उत्सवच नाही, तर वंजारी समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात फालतू खर्च होणार नाही, मुलांना चांगले संस्कार होतील आणि गावातला प्रत्येक मुलगा शिकून नोकरीसाठी बाहेर पडला पाहिजे, असा चांगला संदेश श्री. भरत आंधळे साहेब नेहमी देत असल्याने सर्वत्र साहेबांचे कौतुक होत आहे.

 

*खरा गणपती कसा असावा ?*

 

या निमित्ताने खरा गणपती कसा असावा याचा आदर्श ठाणगावकरांनी घालून दिला आहे.

 

*१. साधा आणि भक्तिमय :* गणपती देखाव्यासाठी नाही, तर श्रद्धेसाठी. साधी मूर्ती आणि मनापासून केलेली आरती यातच खरा उत्सव आहे.

 

*२. त्रासमुक्त आणि डी.जे.मुक्त :* डी.जे.च्या मोठ्या आवाजाने गावातील लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना त्रास होतो. त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांततेत उत्सव व्हावा.

 

*३. व्यसनमुक्त :* बाप्पासमोर दारू पिऊन नाचणे ही भक्ती नव्हे. उत्सव हा पूर्णपणे व्यसनमुक्त असला पाहिजे.

 

*४. सक्तीच्या वर्गणीशिवाय :* वर्गणीसाठी कोणालाही सक्ती करू नये. स्व-इच्छेने दिलेली मदतच बाप्पाला मान्य असते.

 

असा एकोपा वाढवणारा, गावाला चांगली दिशा देणारा उत्सवच खऱ्या अर्थाने बाप्पाला अपेक्षित आहे. सध्या ठाणगाव परिसरामध्ये ठाणगावकरांचा गणपती उत्सव चर्चेचा व आदर्श ठरला आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे