जल्लोषपूर्ण वातावरणात इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचा गणपती बाप्पा विराजमान
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सपत्नीक प्राणप्रतिष्ठा; महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती.

जल्लोषपूर्ण वातावरणात इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचा गणपती बाप्पा विराजमान
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सपत्नीक प्राणप्रतिष्ठा; महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती
नाशिक :जन्मतं ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशन, नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सपत्नीक श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

यानंतर महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवर आणि गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत आरतीमध्ये सहभाग नोंदविला.
या प्रसंगी मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कदम, छावा संघटनेचे विलास पांगारकर, खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्वीयसहायक निलेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष संदेश केदारे, उत्सव समितीचे अध्यक्ष किरण नाईक, संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख सतीश रूपवते, खजिनदार नासीर मन्सुरी, पत्रकार विवेक कडवे, हेमंत काळलेख, शिवाजी आडंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पत्रकारांच्या या गणेशोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे 


