ब्रेकिंग

शहरातील मानाचा व नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विधिवत पूजन व गणरायाची प्रतिष्ठापना .

 

 

नाशिक जनमत  शहरातील मानाचा व नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विधिवत पूजन व गणरायाची प्रतिष्ठापना मनपाच्या वतीने करण्यात आली.

नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणरायाचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून मनपा आयुक्त मनीषा खत्री व नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते मेनरोड येथील मनपा पूर्व विभागीय कार्यालयात नाशिक शहराच्या मानाच्या गणपतीची भक्तिभावाने पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.त्यावेळी त्यांच्या समवेत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा यांच्या मातोश्री रूपाराणी, मुले गुरू व वीर हे उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.पौरोहित्य तेजस क्षेमकल्याणी यांनी केले.

 

 

 

यावेळी प्रभाग सभापती मंगला नन्नावरे,नगरसेवक यशवंत निकुळे, प्रकाश नन्नावरे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,प्रदीप चौधरी, गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय अग्रवाल,अधीक्षक अविनाश धनाईत, अभियंता रवींद्र धारणकर,कार्यकारी अभियंता संदेश शिंदे,सचिन जाधव, गणेश मैड ,रवि बागुल, प्रशांत पगार, रवी पाटील, घनकचरा व्यवस्थापन संचालक आवेश पलोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेटे विभागीय अधिकारी आनंद जाधव, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे तसेच नाशिक महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे

 

 

 

अध्यक्ष सागर खैरे, आनंद जाधव ,सदस्य राजाराम जाधव, गणेश कासार, प्रविण कापसे, मिलिंद पगारे, संकेत खैरनार, गिरीश शिंदे, विक्रम रेवर , हुसेन पठाण, अनिकेत खेळुकर, सुनील खैरे, सारंग जाधव, कुणाल जाधव, गणेश जगताप, कैलास भागवत, अविनाश अहिरे, सुदाम निकम, भरत गोंधळे, वैभव पवार, विशाल गांगुर्डे, सचिन लांडगे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, आणि आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

*मनपा मुख्यालयात महापौर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना*

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापना शहराच्या महापौर हिमगौरी आहेर आडके व अभिजीत आडके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आली. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह प्रभाग सभापती सुरेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या सह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे