नाशिक शहरात अपघाताची मालिका चालूच. दिंडोरी रोडवर बस खाली सापडून दुचाकी स्वराचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र
प्रतिनिधी, नासिक जनमत नासिक शहरात मोठ्या प्रमाणात अपघाताची घटनांमध्ये वाढ होत आहे काल देखील दोन अपघात झालेले आहेत त्यामुळे शहरात
अपघातांची मालिका सुरूच आहे. परवा रात्री सिद्धार्थ गोरे या युवकाचा रात्री बारा वाजता कृषी नगर ते तिबेटियन मार्केट कडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात होऊन त्याचे निधन झाले. तर परवा पाथर्डी फाटा ते वडनेर तुम्हाला रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेल्याचे बातमी आलेली आहे. त्यातच काल
म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी (दि. १३) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास भीषण अपघातात नाशिकहून कळवणच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसच्या चाकाखाली आल्याने एका अज्ञात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून कळवणकडे एसटी बस (एमएच १४, एमएच १४७२) जात होती. याचवेळी मोटारसायकलस्वार (एमएच १५ जेटी ९३३८) देखील त्याच दिशेने प्रवास करत होता. म्हसरूळ येथील बजाज शोरूमजवळ
अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा कट लागल्याने मोटारसायकल थेट एसटीच्या चाकाखाली आली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धान घेतली. मृत तरुणाची रात्री उशिरापर्यं ओळख पटू शकलेली नाही. जवळच्य कागदपत्रांवरून मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.
दरम्यान या अपघातामुळे दिंडोरीरोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
संध्याकाळच्या सुमारास अपघात घडल्याने आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे दिंडोरीरोडवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी हटवत आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्याचे कामे चालू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत त्यातच रिमझिम पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात बुजलेले खड्डे नव्याने होत असून अपघाताची संख्या वाढत आहे. नासिक मध्ये घरात बाहेर पडलेला माणूस पुन्हा घरात येईपर्यंत कुटुंबांना काळजी लागत आहे. पाऊस उघडल्यानंतर रस्त्याची कामे लवकरात लवकर करून नाशिककरांना रहदारी व अपघातातून मुक्त करावे अशी मागणी नागरिक करत आहे.


