मविप्र निवृत्त सेवक संघाची शनिवारी वार्षिक सभा* ————————————- *ज्येष्ठ सभासदांचा होणार ‘अमृत महोत्सवी’ सत्कार सोहळा*

*मविप्र निवृत्त सेवक संघाची शनिवारी वार्षिक सभा*
*ज्येष्ठ सभासदांचा होणार ‘अमृत महोत्सवी’ सत्कार
*नाशिक : जनमत * नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज निवृत्त सेवक संघाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा संघाचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. संघातील ज्या ज्येष्ठ सभासद बंधू-भगिनींनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे, त्यांचा या सभेदरम्यान मविप्र संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते अमृत महोत्सवी सत्कार करून विशेष गौरव केला जाणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, सन २०२५-२०२६ चा वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके (तेरीज, नफा-तोटा व ताळेबंद) मंजूर करणे, तसेच सन २०२६-२०२७ चे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करून हिशोब तपासणीसांची (ऑडिटर) नेमणूक करणे यावर निर्णय घेतले जातील. याशिवाय, संघाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना निश्चित करणे, धर्मदाय उपायुक्तांकडे सादर केलेल्या फेरफार अर्जांच्या मंजुरीची नोंद घेणे आणि घटनेच्या दुरुस्ती मसुद्याला मंजुरी देणे यांसारख्या विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा होणार आहे. मविप्र संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या परंतु अद्याप संघाचे सभासद नसलेल्या कर्मचाऱ्यांची सभेपूर्वी सभासद नोंदणी केली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व निवृत्त सेवकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष अशोक देवकर, सचिव माणिकराव गोडसे, सहसचिव सुदाम आहेर, संचालक लक्ष्मण तिडके, अरुण पिंगळे, दिनकर गोसावी, विठ्ठल पवार, पोपटराव नवले, सदाशिव भामरे, जनार्दन खैरनार, विजय काकळीज, संजय जाधव, अशोक सोनवणे, रघुनाथ हळदे, मोहन कणसे, विजय जाधव, शोभा आरोटे, अनिता घोलप, स्वीकृत सदस्य प्रा.डॉ. बाळासाहेब पवार, प्रा. यशवंत कापडणीस, प्रा. रमेश पाटील, मंगला पवार आदींनी केले आहे.



