ब्रेकिंग

त्र्यंबक रोडवरील तळेगाव अजनेरी येथे बनावट नोटा छापायचा कारखाना.

ग्रामीण पोलिसांची कारवाई.

 

 

, नाशिक/त्र्यंबकेश्वर लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या हवासापोट काही नागरीक गैरमार्गाला  आमंत्रण देत लखपती होण्याचा प्रयत्न करत आहे. तेलंगणा येथील दोन नागरिकांच्या मदतीने जिल्ह्यातील तीन तरुणबनावट नोटा छापण्याच्या या कारभारात अडकले आहे नोटा  छापण्याची पद्धत बघून पोलीस देखील c चक्रावले  आहेत.

 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटा छपाईच्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. दहा लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून हा व्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून लाखोंच्या बनावट नोटा, प्रिंटर, विशेष कागद, कटिंग मशीन, केमिकलच्या बाटल्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने संशयितांना सोमवार, १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठ

 

सुनावली आहे.

 

नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तेलंगणातील दोघे आणि नाशिकमधील तिघांचा समावेश आहे. अमरेश्वर सुधाकर आईथा (वय ३७, तेलंगणा),

 

 

 

(लाखोंच्या बनावट नोटा, प्रिंटर, केमिकलच्या बाटल्या आदी साहित्य जप्त)

 

(दहा लाखांच्या बदल्यात ३० लाखांचे आमिष)

 

 

दासहरी प्रसाद सत्यई (३६, तेलंगणा), गोकुळ आनंदराव दाते (५६, रा. ध्रुवनगर, मूळ रा. तळेगाव, ता. नाशिक), हिरामण पुंजा दाते वय (५६, रा. तळेगाव, ता. नाशिक) आणि मच्छिंद्र भगवान घनदाट (रा. घाटोळ गल्ली, सातपूर) अशी

 

संशयितांची नावे आहेत. तळेगाव येथील बंगल्यात बनावट

 

नोटा छापण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला. या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेरही पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयितांनी आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात खपवल्या, याचा तपास सुरू आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे