आज पासून बडनेरा-नाशिक मेमू नियमित सेवेत


, नाशिकरोड
हजारो नागरिकांच्या सुरक्षित प्रवास करणाऱ्या बडनेरा नाशिक रोड रेल्वे आज पासून नियमित धावणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने बडनेरा ते नाशिकरोडदरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष रेल्वेचे आज, १५ ऑगस्टपासून नियमित सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ६११३० बडनेरा-नाशिकरोड मेमू दररोज बडनेरा येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७.४० वाजता नाशिकरोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ६११२९ नाशिकरोड-बडनेरा मेमू दररोज नाशिकरोड येथून रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता बडनेरा येथे पोहोचेल. या गाडीला मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड येथे थांबे असतील. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी ‘रेल ऑन’ अॅप डाउनलोड करता येईल.


