ब्रेकिंग

आदर्श प्राथमिक *विद्यालयात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*  

*आदर्श प्राथमिक *विद्यालयात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*

 

नाशिक जनमत   एकलहरे : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, एकलहरे येथे दीपावलीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विद्यमान संचालक तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री प्रकाश भाऊ घुगे साहेब तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीयुत. कराड सर , शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती सरला सानप उपस्थित होत्या,

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दीपावलीच्या पाचही दिवसांचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी मुख्याध्यापक सरला सानप यांनी सांगितल्या वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज या सणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

 

विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा, सुंदर रांगोळ्या, पणत्या सजावट, आकाशकंदील व विविध कलाकृतींच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता व्यक्त केली. तसेच फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.मुलांनी पर्यावरणाची प्रतिज्ञा घेतली .

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह, सांस्कृतिक जाणीव आणि परंपरांविषयी आदर निर्माण झाला. संपूर्ण शालेय परिसर दिव्यांच्या प्रकाशाने व आनंदाने उजळून निघाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरला सानप सूत्रसंचालन चित्रकला देशमुख आभार सांगळे उत्तम यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या रूपाली सांगळे पल्लवी वेडे किरण गवारे बिश्वास भाभी यांनी क विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे