पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महाध्वज ग्राम परिक्रमा प्रारंभ*

*पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महाध्वज ग्राम परिक्रमा प्रारंभ*
*नाशिक, दि. ३० ऑक्टोबर नाशिक जनमत वृत्तसेवा) :* नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पर्वाला धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात प्रारंभ होत असून, संत-महंत, आखाडे आणि हजारो भाविकांच्या सहभागामुळे कुंभमेळ्याची भव्यता अधोरेखित होत आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकची धार्मिक अस्मिता आणि सनातन हिंदू धर्माची गौरवशाली परंपरा जपणारा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शासन, प्रशासन, संत-महंत आणि भाविकांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळा महाध्वज ग्राम परिक्रमेचा आज तपोवन मैदान येथून प्रारंभ झाला. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते महाध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर संत-महंत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाध्वज ग्राम परिक्रमेचा ध्वज रामतीर्थ पंचवटीकडे रवाना करण्यात आला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, श्रीमहंत ज्ञानदास महाराज, मंगलपीठाधीश्वर श्री १००८ माधवाचार्य महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज, श्री. पंच निर्मोही अग्नी आखाड्याचे श्री. महंत राजेंद्रदास महाराज, महंत संजयदास महाराज, श्री. महंत मुरलीदास महाराज, श्री. महंत वैष्णवदास महाराज, पंच दिगंबर अग्नी आखाड्याचे श्रीमहंत माधवदास महाराज, श्रीमहंत मोहनदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत रामस्नेही महाराज यांच्यासह महंत व भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनिंनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर महाध्वजाचे पूजन करण्यात आले. धार्मिक विधी आणि जयघोषाच्या वातावरणात महाध्वज ग्राम परिक्रमेसाठी सुपूर्द करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाध्वजाचे दर्शन घेत परिक्रमेत सहभाग नोंदविला.
पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविणारा जागतिक स्तरावरील महोत्सव आहे. या पर्वासाठी देशभरातून तसेच जगभरातून कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. या आयोजनात संत-महंतांचे मार्गदर्शन आणि स्वयंसेवकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाध्वज ग्राम परिक्रमेच्या माध्यमातून सिंहस्थ

कुंभमेळ्याचा धार्मिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, भाविकांमध्ये कुंभमेळ्याविषयी भक्तिभाव आणि उत्साह निर्माण होत आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक समरसता, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सेवाभावाच्या माध्यमातून हा कुंभमेळा यशस्वी करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितल

यावेळी महंत संजयदास महाराज यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.



