ब्रेकिंग

अमळनेरच्या तरुणीचा नाशकात एकतर्फी प्रेमातून खून.

शिक्षण घेण्यासाठी आली होती तरुणी इंदिरानगर परिसरात खून

एकतफा प्रमातून भररस्त्यात तरुणीचा गळा चिरून निघृण खून

इंदिरानगरातील उद्यान परिसरात रात्री १०.३०ची घटना

प्रतिनिधी

| नाशिक

इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास तरुणीच्या खुनाची घटना उघडकीस आली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज हा आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर प्रियकर फरार झाला असून, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे. वैष्णवी आवारे (२०) असे या तरुणीचे नाव आहे.

मृत वैष्णवी आवारे पोलिसांनी व्यक्त केला

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तरुणीचा खून झाल्याची माहिती मिळाली. पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या

(रात्री साडेदहा वाजता झालेली घटना

 

 

(तरुणी मूळची अंमळनेरची असून, येथे शिक्षणाकरिता कानडे रोहाऊसमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेली असता संशयित तरुण आला. तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. निघून जाताना संशयिताने खिशातून चाकू काढून तरुणीच्या गळ्यावर वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. संशयित फरार झाला आहे.)

मृतदेहाची पाहणी केली असता चाकू गळ्यात भोकसून खून केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी चाकू मिळून आला आहे. या ठिकाणी इंदिरानगर पोलिस पथक तसेच गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 

 

हल्लेखोर प्रियकर फरार झाला असून इंदिरानगर पोलीस स्टेशन शोध घेत आहे वैष्णवी आवारे असे मृत्यू झालेल्या युवतीचे  नाव आहे  वय 20  आहे या घटनेने इंदिरानगर परिसर हादरून  गेला आहे. नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होत असल्याचे सर्वत्र चित्र आहे पोलिसांतर्फे गुन्हेगारांना कायद्याचा बाल किल्ला दाखवला जात असला तरी पोलिसांचा वचक त्यांच्यावर कमी झाल्याचे दिसत आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे