राजापूर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व काशिनाथ संभाजी घुगे यांचे निधन.

निधन वार्ता.
नासिक जनमत : येवला तालुक्यातील राजापूर येथील काशिनाथ सबाजी घुगे वय (९५) याचे वृधदापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले सुना नातवंड असा परिवार आहे येवला तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन तथा पञकार लक्ष्मण घुगे व वृत्तपत्र विक्रेते व गायत्री मेडिकलचे संचालक राजेंद्र घुगे याचे वडील होत. काशिनाथ संभाजी घुगे हे गावातील नावाजलेले प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्त्व होते. सर्व सामान्य नागरिकांना मदत करणे समाज उपयोगी काम करण्यास ते नेहमी पुढे असायचे. 95 वर्ष त्यांचे वय होते. नासिक जनमत चे संपादक चंद्रकांत धात्रक यांचे आजोबा होते. पावणे सहा फूट उंची. तोंडात सुपारी पान रुवाबशील बोलणे. स्पष्ट वक्ते ते होते नाशिक येथील रामदास बोडके यांचे ते सासरे होते. नियमित आरोग्यासाठी व्यायाम करणे दररोज चार ते पाच किलोमीटर चालणे यामुळे ते वयाची शंभरी काढतील असे वाटत असताना अचानक वृद्ध काळाने त्यांचे निधन झाले.
नाशिक जनमत परिवार घुगे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहेत.
दैनिक आवाज परिवार घुगे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.



