ब्रेकिंग

चार वर्षापूर्वी अट्टल घरफोडी करणाऱ्या युवकास गणेश शाखा दोन कडून अटक.

 

 

: नाशिक जनमत  – उपनगर पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल चार वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी दानिश निसार खान (वय ३१, रा. रजा क्लासिक अपार्टमेंट, काझीनगर, नागजी-वडाळा रोड, नाशिक) याला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सापळा रचून अटक केली.

 

आरोपी मिळून येत नसल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

 

शहरातील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ चे पथक फरारी आरोपींचा शोध घेत होते.

 

या दरम्यान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहितीदारामार्फत दानिश खान हा आयशा मशिदीजवळील रजा क्लासिक अपार्टमेंट परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने

 

वडाळा नाका येथील आयशा मशिदीजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

 

या चौकशीत आरोपीने उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही कारवाई गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुडकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजीरे आणि सुनील खैरनार यांनी यशस्वी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे