बस दरीत कोसळून पाकमध्ये चाळीस ठार खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा जिल्ह्यातील घटना
बस दरीत कोसळून पाकमध्ये चाळीस ठार
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा जिल्ह्यातील घटना
वृत्तसंस्था, पाकिस्तान
पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी प्रवासी बस दरीत कोसळल्याने महिला आणि लहान मुलांसह किमान ४० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही बस बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून पेशावरकडे निघाली होती. बस खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात पोहोचल्यानंतर हा अपघात झाला.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्याने डोंगराळ भागातील अवघड वळण घेताना चालकाचे नियंत्रण
सुटले त्यानंतर बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध सुरू आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांचे माध्यम आणि राजकीय व्यवहार सल्लागार शाहिद रिंद म्हणाले, ‘या अपघातात ४० जणांचा मृत्यू झाला असून, आणखी आठ जण जखमी झाले आहेत.



