धरण परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांवर कारवाई

नाशिक जनमत सध्या मोठ्या प्रमाणात नाशिक व धरन परिसरात पाऊस पडत आहे. धरन परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी व मागील महिन्यात वालदेवी धरण गंगापूर धरण परिसरामध्ये काही उत्साही पर्यटक धरण उतरल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यामध्ये काही जणांनी आपले प्राण गमावले. जिल्हा प्रशासनाने पर्यटनास या ठिकाणी बंदी घातली असून धरन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शनिवारी रविवारी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही पर्यटक हुल्ड बाजी करतात . यामुळे सध्या बंदोबस्त वाढला आहे काल कश्यपी धरण परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सात वाहनांवर हरसूल पोलिसांनी कारवाई करत ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला!
रविवारी धरण परिसरात हजारो पर्यटकांची गर्दी झाली होती.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. सुमारे सात किलोमीटर परिसरात एक अधिकारी व सात पोलिस कर्मचारी तैनात केले होत
मुसळधार पावसामुळे धरण परिसर ‘धोकादायक बनला असतानाही काही पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करत होते. काही
वाहनचालकांकडून रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. अशा सात वाहनधारकांवर कारवाई करून दंड वसूल केल
नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेत धरणाच्या पाण्यात बुडून एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना पर्यटकांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. कोणतीही जीवितहानी किंवा अपघात टाळण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. जीवन अमूल्य आहे. जीव धोक्यात घालू नका. आपल्या जीवाची काळजी घ्या असे नाशिक जन्मतर्फे नागरिकांना या बातमीद्वारे आव्हान करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील गड किल्ले गंगाद्वार. इत्यादी परिसरात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे पर्यटकांची गर्दी देखील वाढली आहे. पर्यटकांनी आपली काळजी घ्यावी.



