ब्रेकिंग

रस्त्याच्या काँक्रीटमध्ये तडे; निकृष्ट भाग पाडण्याचे आदेश, ठेकेदाराला दररोज Rs 1.84 लाख दंड

रस्त्याच्या काँक्रीटमध्ये तडे; निकृष्ट भाग पाडण्याचे आदेश, ठेकेदाराला दररोज Rs 1.84 लाख दंड

 

वेद मंदिर परिसरातील रस्त्याच्या कामाची आयुक्त मनीषा खत्री यांची पाहणी; गुणवत्तेतील त्रुटींवर तातडीची कारवाई

 

नाशिक जन्मत  : बॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोर सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामात गुणवत्तेच्या त्रुटी आढळल्यानंतर नाशिक महापालिकेने संबंधित कामाचा निकृष्ट भाग तात्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित ठेकेदारावर दररोज Rs 1.84 लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे.

 

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काँक्रीटच्या काही पॅनेलमध्ये मानकांपेक्षा अधिक तडे (क्रॅक्स) आढळून आले. कामाची गुणवत्ता अपेक्षित निकषांनुसार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित भाग पुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच कामातील त्रुटींची दखल घेत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

यावेळी आयुक्त खत्री म्हणाल्या, “विकासकामांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांच्या पैशाचा योग्य विनियोग होणे ही आमची जबाबदारी आहे.”

 

महापालिकेकडून शहरातील विविध विकासकामांची नियमित गुणवत्ता तपासणी सुरू असून, निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका कायम ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे