ब्रेकिंग

नाशिक शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणास महापौरांपासून झाली सुरूवात*

*नाशिक शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणास महापौरांपासून झाली सुरूवात*

*नाशिक, दि. 30 जून नाशिक जनमत  : . भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादी विशेष सखोल परीक्षणास महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्यापासून आज सुरुवात झाली.

जिल्ह्यात मतदार विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत आजपासून गृह भेटीस सुरुवात झाली. त्यानुसार नाशिक शहराच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती आडके यांचा प्रगणना अर्ज भरुन घेण्यात आला. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमोल निकम, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सारिका आहेर आदी उपस्थित होते.

महापौर श्रीमती आहेर म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित केली जाणार असल्याने नागरिकांनी अधिकारी व केंद्रस्तरीय मतदार अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन पूर्ण सहकार्य करावे.

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी व बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देऊन Enumeration Form भरून घेतील. नागरिकांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

०००००

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे