ब्रेकिंग

मॉन्सून टास्क फोर्सची प्रत्यक्ष मैदानात सुरुवात; शहरातील सहा प्रभागांमध्ये पाहणी करत तातडीच्या कामांना प्रारंभ

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समन्वयातून पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजनांना वेग

मॉन्सून टास्क फोर्सची प्रत्यक्ष मैदानात सुरुवात; शहरातील सहा प्रभागांमध्ये पाहणी करत तातडीच्या कामांना प्रारंभ

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समन्वयातून पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजनांना वेग

शहरात एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामांना वेग देण्यात येत असताना आणि दुसरीकडे पावसाळ्याची सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नागरी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या विशेष मॉन्सून टास्क फोर्सने आजपासून प्रत्यक्ष मैदानात कामकाज सुरू केले. प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात थेट समन्वय निर्माण करत शहरातील विविध भागांमध्ये पावसाळी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या विशेष मोहिमेची आज पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी करण्यात आली. महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे, नगरसेवक आणि ६ विभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध भागांतील कामांचा आढावा घेतला.

 

महापालिकेने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १५, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक १७, नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २४ तसेच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ या सहा प्रभागांमध्ये विशेष पथके उतरवून प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबविली. प्रत्येक भागात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत संभाव्य पावसाळी अडचणी ओळखून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या.

प्रभागनिहाय पाहणी व कामे

विभाग

प्रभाग क्रमांक

पंचवटी विभाग

नाशिक पूर्व विभाग

१५

नाशिक पश्चिम विभाग

नाशिक रोड विभाग

१७

नवीन नाशिक विभाग

२४

सातपूर विभाग

 

 

संबंधित विभागांचे नियुक्त नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, अभियंते तसेच संबंधित प्रभागांतील लोकप्रतिनिधी देखील या पाहणीदरम्यान उपस्थित होते. स्थानिक स्तरावर नागरिकांकडून वारंवार समोर येणाऱ्या समस्यांवर चर्चा करत प्राधान्याने कोणती कामे हाती घ्यावीत याबाबत स्थळावरच निर्णय घेण्यात आले.

पाहणीदरम्यान नालेसफाई, गटार व्यवस्थेची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्ड्यांची नोंद व दुरुस्ती, पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची तपासणी, पाइपलाइन गळती, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच पावसाळ्यात तातडीने उद्भवू शकणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापालिकेच्या मॉन्सून टास्क फोर्स अंतर्गत प्रत्येक विभागात नियुक्त करण्यात आलेली विशेष पथके सलग चार दिवस संबंधित प्रभागात कार्यरत राहून स्थानिक समस्या सोडविणार असून त्यानंतर नियोजनानुसार पुढील प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात पावसाळा आणि शहरातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे या दोन्हींचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी महापालिका यंत्रणा अधिक सजग आणि सक्रिय पद्धतीने काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांनी आपल्या परिसरातील पावसाळ्याशी संबंधित कोणतीही समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा महापालिकेकडे कळवावी, जेणेकरून विशेष पथकांच्या माध्यमातून त्यावर तातडीने कार्यवाही करता येईल, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे