मित्राने केला जुन्या वादातून देवळाली गावात मित्राचा खून.
देवळाली परिसर हादरला. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी.

जुन्या वादातून मित्राचा केला खून
प्रतिनिधी । नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अतिशय किरकोळ वादातून कुणाच्या घटना घडत आहे. पोलिसांची टवाळ पोरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई चालू असली तरी गुन्हेगारी कमी होत नाही असे सर्वत्र दिसत आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला असला तरी पोलिसांचा धाक गुन्हेगारांना कमी वाटत आहे. काल नाशिक शहरा जवळील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील
देवळाली गावात जुन्या वादातून धारधार शस्त्राने गळा चिरून विशाल माळवे (३६, रा. सुवर्ण सोसायटी, खोले मळा) या तरुणाचा खून करण्यात आला.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड हे दोघे शुक्रवारी पहाटे एकत्र पार्टी करत होते. पार्टी सुरू असतानाच दोघांमध्ये जुन्या वादावरून शाब्दिक
चकमक उडाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संशयित अमोल गायकवाड याने रागाच्या भरात धारदार हत्याराने विशालवर जोरदार वार केले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी संशयित अमोल गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी संपूर्ण नाशिक शहरात रात्रीची गस्त वाढवावी. शहरातील चौका चौकात बसणाऱ्या टवाळ खोरांवर कारवाई करावी. दहानंतर देखील चालू असलेली दुकाने बंद करावी अशी मागणी नागरिक करत आहे. खुना च्या घटनेने नाशिक शहर आदरले आहे.


