ब्रेकिंग

सातपूर मधील प्लास्टिकच्या खोके बनवणाऱ्या कंपनीला आग.

नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

नाशिक जनमत      काल सकाळी सातपूर मधील एका कंपनीला आग लागली होती. यावेळेस नागरिकांन कामगारांमध्ये घबराटीचे  वातावरण पसरले. दरम्यान अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे तीन बंबानी आग आटोक्यात आणली. याबाबत सविस्तर वृत्त असे की

सातपूर | सातपूर एमआयडीसीतील प्लास्टिक खोके

बनवणाऱ्या व्ही ३ एंटरप्रायझेस कंपनीत बुधवारी (दि. २४) सकाळी ९.४५ च्या सुमारास आग लागली. यात कंपनीचे नुकसान झाले. कंपनी बंद असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी बंद असून, साहित्य दुसरीकडे शिफ्ट करताना प्लास्टिक रॉ मटेरियलच्या गोडावूनला आग लागली. सातपूर अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी तासाभरात आग नियंत्रणात आणली. केंद्रप्रमुख व्ही. के. मुसळे, लीडिंग फायरमन प्रमोद लहामगे आदींनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे