महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे सारडा सर्कल येथे असलेली अतिक्रमे ने जमीनदोस्त

नाशिक जनमत महानगरपालिका अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते चौक मंडई परीसरातील अतिक्रमणे रविवारी पहाटे धडक अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमीत दुकाने, पत्र्याचे शेड्स असे जवळपास ६० ते ६५ टपऱ्या/ दुकाने हटविली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचे आदेशाने व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या सह पोलीस विभागाचे अधिकारी, मनपाचे विभागीय अधिकारी व मनपा कर्मचारी यांचे उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
*मोहिमेत ६०/६५ अतिक्रमणे हटविली*
सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत अतिक्रमणे काढण्यात आली.
नाशिक पूर्व विभागातील मौजे नाशिक गावठाण स.नं.३८००/२ येथील सारडा सर्कल येथील स्मशानभुमी आरक्षणाच्या जागेतील तसेच डी.पी. रस्त्यावरील सर्व अतिक्रमीत दुकाने, पत्र्याचे शेड्स जवळपास ६० ते ६५ टपऱ्या काढण्यात आल्या. तसेच स.नं.५३२/अ/१ या मंजुर अभिन्यासातील ओपन स्पेस व वहीवाटीच्या जागेत, हॉटेल डिलक्सच्या मागील बाजुस काही व्यवसायीक चारचाकी वाहने तोडण्याचे कामकाज करीत होते व आपल्या गाड्यांचे भंगार साहित्य व मनपाच्या मोकळ्या भुखडावर अनाधिकृतपणे ठेवत होते. तो भुखंड मोकळा करण्यात आलेला आहे. याच भुखंडालगत आठ व्यवसायीकांचे शेड डी.पी. रस्त्यात येत असल्याने त्यांचा काही भाग तोडण्यात आलेला आहे. तसेच याच भुखंडावर दोन तीन रहीवासी घरे

देखील अनाधिकृतपणे वास्तव्यास आहेत सद्यस्थितीत पावसाळा असल्याने त्यांना पावसाळा संपेपर्यंतची मुदत देणेत आलेली असुन पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यात जर या रहीवाश्यांनी सदर जागा रिकामी केली नाही तर अतिक्रमण विभागामार्फत काढून घेण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली
*मनुष्यबळ व सामग्री*
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत मनपाच्या सहाही विभागातील अतिक्रमण विभागाचे पथके यांचे सह ६ जे.सी.बी ४ ट्रॅक्टर आदी सामग्रीच्या सहाय्याने ही मोहीम पार पडली.
मोहीम यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी हेमंत झुटे,चंदन घुगे,राहुल जाधव, नानासाहेब साळवे, राजभोज, प्रज्ञा त्रिभुवन,अभियंता संतोष जोपूळे,संजय चौधरी,विनायक जाधव, सुरेंद्र वाघ स्वप्निल भांगरे,सहाय्यक अधीक्षक संजय चौधरी, वाघ आदींसह सहाही विभागीय कार्यालयातील अतिक्रमण पथकातील कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते.


