संभाजी नगरातील पाच जणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू.

नाशिक जनमत संभाजीनगर व बिडकीन येथील 19 जणांचा समूह देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. अतिशय चांगली त्यांची ट्रीप चालू होती देवदर्शन नंतर समुद्रकिनारी हे सर्व युवक गेले होते आंघोळीसाठी समुद्राच्या पाण्यात हे उतरले दरम्यान येणाऱ्या पाण्याचा लाटा कमी अधिक प्रमाणात येत होत्या दरम्यान येणाऱ्या लाटांचा अंदाज या तरुण युवकांना आला नाही त्यातील काही युवक पाण्यांच्या लाटासह समुद्रात ओढले गेले त्यात पाच तरुण युवकांचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की



गणपतीपुळे येथील समुद्रात पाच पर्यटक शनिवारी बुडाले. त्यातील प्रेम दीपक आदमाने (१९) या तरुणाचा मृतदेह सापडला असून, बेपत्ता असलेल्या चौघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हे सर्व पर्यटक छत्रपती संभाजीनगरमधील आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा समूह गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. त्यातील काही जण शनिवारी सकाळी १०च्या सुमारास समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाच जण समुद्राच्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले. ते बुडत असल्याचे लक्षात येताच अन्य
तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. जीवरक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी त्यांनी गणपतीपुळे येथे धाव घेत तटरक्षक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९), यश रामेश्वर कांबळे (१९) अशी या पाच तरुणांची नावे आहेत. ते छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन येथील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. त्यातील प्रेम आदमाने या तरुणाचा मृतदेह सापडला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक महामुनी यांनी दिली. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि जीवरक्षक स्थानिक बोटींच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या घटनेची बातमी संभाजीनगर जिल्ह्यात व बिडकीन येथे येतात सर्व नागरिकांमध्ये शोक पसरला आहे. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.


