मोबाईल, सोन्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा : पाच दिवसांची पोलिस कोठडी पुण्यातून अटक.
नाशिक जनमत येवला, लवकरात लवकर श्रीमंत होणे यासाठी नागरिकांना फसवणाऱ्या नगरसूल च्या एका व्यक्तीला पुण्यात अटक करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर. माहिती अशी की सोने तसेच महागडे मोबाईल कमी किमतीत मिळवून देतो असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नगरसूल येथील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातून सिनेस्टाईल अटक केलेल्या या आरोपीला येथील न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित सुप्रसाद प्रमोद दीक्षित (रा. नगरसूल, ता. येवला) याला पोलिसांनी पुणे येथून सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या महाघोटाळ्याची व्याप्ती काही कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुप्रसाद दीक्षित याने नगरसूलसह तालुक्यातील काही तरुण व नागरिकांना नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन अर्ध्या किमतीत देण्याचे तसेच स्वस्तात सोने उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला काही लोकांना विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वस्तात फोन दिले. त्यानंतर शेकडो तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळून तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार झाला होता. याप्रकरणी येवला
तालुका पोलिस ठाण्यात अंकुश शिरसाट व इतर पीडितांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यातून सिनेस्टाईल अटक
आरोपी दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असल्याने त्याच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. १८ जूनला संशयित आरोपी पुणे येथे लपून बसल्याची गुप्त मा हिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांनी तातडीने पुण्यात जाऊन अत्यंत गोपनीय व सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १९ जूनला त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची २३ जूनपर्यंत (५ दिवस) पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किंवा इतर भागातील ज्या नागरिकांची या आरोपीने अशा प्रकारे आर्थिक फसवणूक केली आहे, त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय समोर यावे. आप ल्या क डे असलेल्या ऑनलाईन व्यवहारांच्या कागदपत्रांस ह तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी केले आहे.



