दादासाहेब गायकवाड सभागृह मागील ट्रान्सपोर्ट गोदामाला लागली आग.
चार तासानंतर आग आटोक्यात. अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न

नाशिक जनमत काल सायंकाळी सात वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर ट्रान्सपोर्ट मधून दूर निघत असल्याचे जवळ असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्याचे कर्मचारी आणि नागरिकांच्या हे लक्षात आले काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान अग्निशामक दलाचा बम घटनास्थळी दाखल झाला यावेळी जवानांकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र आईल आणि कपड्याच्या गाठी मुळे आग अधिकच भडकल्याचे दिसून आले.
अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली आगीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती
यामुळे काही काळ या ठिकाणी ट्राफिक जाम झाली होती मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी येत गर्दी पांगवली.
अग्निशामक दलाच्या 10 विभागातून दहा गाड्या च्या साह्याने शर्तीच्या प्रयत्नानंतर व चार तासानंतर आग रात्री उशिरा अकरा वाजता दरम्यान आटोक्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपड्याच्या गाठी आणि ऑइल मुळे आग मोठ्या प्रमाणात लागली यामध्ये लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.




