ब्रेकिंग

वडनेर गेट ते विहितगाव मार्ग भाविकांसाठी सज्ज साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण आणि पायाभूत सुविधा विकासाचे काम प्रगतिपथावर.

वडनेर गेट ते विहितगाव मार्ग भाविकांसाठी सज्ज

साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण आणि पायाभूत सुविधा विकासाचे काम प्रगतिपथावर

 

नाशिक : नाशिकरोड परिसरातील रेल्वे स्थानकाला त्र्यंबक रोडशी जोडणारा वडनेर गेट ते विहितगाव (लॅम रोड) हा मार्ग वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सुमारे ३.५६५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांमधील संपर्क अधिक सुलभ होणार असून, वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नाशिक महापालिका या रस्त्यावरील पायाभूत सुविधांचा विकास करीत असून, सिंहस्थाच्या दृष्टीने असंख्य भाविकांना हा सर्व सुविधांनी सज्ज असा हा रस्ता महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

 

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ तसेच शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून विविध प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडनेर गेट ते विहितगाव (लॅम रोड) या मार्गाचे डांबरीकरण आणि पायाभूत सुविधा विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.

 

रस्त्याच्या कामासोबतच विविध युटिलिटी सेवांचे कामही करण्यात येत आहे. यात एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे ९८ ते १०० टक्के काम पूर्ण झाले असून, महानगरपालिकेची ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) आणि विद्युत पायाभूत सुविधांचे सुमारे ३,५०० मीटरपर्यंतचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच २,३८५ मीटर लांबीच्या पावसाळी पाणी निचरा वाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे.

 

युटिलिटी कामांची सद्यस्थिती

 

युटिलिटी सुविधा

लांबी

प्रगती

एमएनजीएल गॅस पाइपलाइन

९८ मीटर

१००% पूर्ण

ओएफसी / एनएमसी विद्युत पायाभूत सुविधा

३,५०० मीटर

१००% पूर्ण

अमृत डीपीआर-२ सांडपाणी वाहिनी

१०७० मीटर

काम प्रगतिपथावर

पाणी निचरा वाहिनी

२,३८५ मीटर

काम प्रगतिपथावर

 

 

असे आहेत फायदे

✓ नाशिक रोड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

✓ रेल्वेस्थानक ते त्र्यंबक रोड प्रवास अधिक सुलभ

✓ भविष्यातील वाहतूक नियोजन योग्यरीत्या होईल

✓ पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण

✓ सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते सुविधा

 

“सिंहस्थ कुंभमेळा २०२७ आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून नाशिक महानगरपालिका महत्त्वाच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्याने गती देत आहे. वडनेर गेट ते विहितगाव हा मार्ग भाविकांसाठी तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गावरील डांबरीकरणासोबतच विविध युटिलिटी सुविधांची कामेही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली जात असून, नागरिकांना अधिक सुरक्षित, सक्षम आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे