कॉकरोच जनता पक्षाचे अभिजीत दीपके यांना जयपुर मध्ये महाराण.

अभिजीत दीपकेंना जयपूरमध्ये मारहाण
नाशिक जनमत वृत्तसंस्था, जयपूर येथे नीट पेपर फुटी बेरोजगारी या विषयावर आंदोलन चालू असताना अभिजीत दीपके यांना डोक्यावर एक कार्यकर्ता घेऊन जात असताना गर्दीतील एकाने थप्पड मारली याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत सविस्तर असे की
कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना येथील एका आंदोलनादरम्यान काहींनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
समर्थक दीपके यांना खांद्यावर घेऊन जात असताना थप्पड मारण्यात आली. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना शहीद स्मारक येथे घडली. ‘नीट’ पेपरफुटी आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण जमले होते.

दीपके आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यांना समर्थक खांद्यावर घेऊन जात असताना, गर्दीतील काही तरुणांनी त्यांना थप्पड मारली. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी आरोपींना पकडले आणि पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी त्यांना मारहाण केली.



