रूपाली निकुळे नगरसेवक यांची प्रभागातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर भेट

नाशिक जनमत प्रभाग क्रमांक 23 मधील अनेक कामे थांबले असून ती लवकरात लवकर करण्यासाठी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वर्षा निवासस्थानी भेट घेऊन नाशिक महानगर पालिकेच्या शहरातील सर्व प्रभागातील कॉलनी रस्ते कामांना व प्रभाग 23 मधील अशोका मार्ग ते दिपाली नगर हायवे, पखाल रोड, नंदिनी नदी ते पाथर्डी गावं या डी पी रस्त्यानसाठी निधी उपलब्ध करून देणे कामी निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी रिकामे लवकरात लवकर होतील असे आश्वासन नगरसेवक श्रीमती रूपाली निकुळे यांना दिले आहे.

या प्रसंगी महंत कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा,अध्यक्ष अखिल भारतीय महानुभव परिषद,
हिमगौरी आडके
महापौर नाशिक मनपा,मंगला ननावरे
सभापती,पूर्व विभाग, मनपा,
रुपाली निकुळे नगरसेविका प्रभाग 23
प्रकाश ननावरे अध्यक्ष महानुभ पंथ महाराष्ट्र यशवंत निकुळे ,माजी नगरसेवक
महंत चिरडे बाबा,निफाड राविभाऊ उफाडे,संजय पवार,विजय चव्हाण आदी उपस्थित होते.



