ब्रेकिंग

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘प्लॉट एक्स्पो’ मुळे शेकडो नागरिकांचे प्लॉट बुकिंग दीर्घकाळात उत्तम परतावा देणारा पर्याय.

सहा हजार नागरिकांनी दिली एक्सपोला भेट. काल झाला समारोप

 

 

प्रतिनिधी । नाशिक   जनमत दोन दिवसीय प्लॉट एक्सपोला नागरिकांतर्फे मोठ्या प्रतिसाद लाभला. तीनशे नागरिकांनी साईट विजिट करत अनेकांनी प्लॉट बुकिंग केले. आठ लाखापासून प्लॉट बुक होत असल्याने व शनिवार रविवार असल्याने सुट्टीचा फायदा घेत सहा हजार नागरिकांनी प्लॉट एक्सपोला भेट दिली.

 

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे पहिल्यांदाच आयोजित ‘प्लॉट एक्स्पो’ म्हणजे प्लॉटच्या प्रदर्शनास मिळालेल्या प्रतिसादाने नाशिकच्या अर्थकारणास बूस्ट मिळणार आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि. १४) समारोप झाला. या दोन दिवसांत १५० हून अधिक प्लॉटची विक्री झाली असून एक्स्पोला सुमारे ६००० नागरिकांनी भेट दिली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.

जमिनीमध्ये गुंतवणूक करणे हा एक अत्यंत सुरक्षित, स्थिर आणि दीर्घकाळात उत्तम परतावा देणारा पर्याय मानला जातो. जमिनीच्या वाढत्या किमती आणि मर्यादित उपलब्धता यामुळे ही गुंतवणूक नेहमीचे फायदेशीर ठरते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॉटच्या प्रदर्शनाचे आयोजन हे पहिल्यांदाच होत असून याला मिळालेला प्रतिसाद म्हणजे भविष्यातील नाशिकमधील उत्तम

 

(300 हून अधिक साईट व्हिजिट

प्रदर्शन कालावधीत ३०० हून अधिक साईट व्हिजिट झाल्या असून आगामी काळात देखील अनेक साईट व्हिजिटचे नियोजन झाले आहे. श्याम साबळे, सहसमन्वयक, प्लॉट एक्स्पो

परतावा देणारी आज केलेली गुंतवणूक म्हणावे लागेल असे एक्स्पोचे समन्वयक भूषण कोठावदे यांनी सांगितले. नाशिकसह मुंबई, पुणे, जळगाव, धुळे, कोल्हापूर, अहिल्यानगर येथून देखील अनेकांनी एक्स्पोला भेट दिली.)

अधिक परतावा, मर्यादित पुरवठा, कमी देखभाल खर्च, आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरता, लवचिकता आणि पसंतीनुसार

 

बांधकाम डिझाइन, दीर्घकालीन वारसा या कारणांनी जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल दिसून आल्याचे सांगत रियल इस्टेट क्षेत्रामध्ये क्रेडाई ची ओळख ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून आहे. त्यामुळे क्रेडाईने आयोजित केलेल्या प्लॉट एक्स्पोला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे क्रेडाई एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा यांनी नमूद केले. नाशिक आता चोहो बाजूला विस्तारत असल्याची प्रचिती या एक्स्पोला मिळालेल्या प्रतिसादाने आल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी नमूद केले. एक्स्पो यशस्वितेसाठी आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, उदय घुगे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे