संस्थेच्या नावाचा गैरवापर करून अवैध वसुलीचा आरोप्.
संस्थेच्या नावाचा गैरवापर करून अवैध वसुलीचा आरोप्र तिनिधी,
नाशिक जनमत ठाणे दि. ०५ : अखिल भारत गुजराती समाजाच्या नावाचा आणि पदांचा गैरवापर करून काही माजी पदाधिकाऱ्यांकडून अवैध पैसे उकळत आल्याचा गंभीर आरोप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जे. पटेल यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकार उघडकीस आणत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. संजय पटेल यांनी सांगितले की, अखिल भारत गुजराती समाज ही १९६८ साली स्थापन झालेली नोंदणीकृत राष्ट्रीय संस्था असून ३० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधिवत निवडणुकीत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र काही माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या नावाचा गैरवापर करत स्वतःला विविध पदांवर असल्याचे भासवून कार्यक्रम आयोजित केले आणि त्यातून स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली केल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत त्यांनी माजी अध्यक्ष हरेंद्र तन्ना, लीलाबेन तन्ना आणि माजी महामंत्री मगनभाई
निष्पक्ष चौकशीची मागणी
AKHIL DHARAT GUJARATI SAMAJ
ठक्कर यांच्यावर गंभीर आरोप केलेआहेत १२ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘गीत-गायन स्पर्धा’ कार्यक्रमासाठी संस्थेच्या नावाचा वापर करून स्पॉन्सरशिप गोळा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी पत्रके आणि जाहिरातींचा वापर करण्यात आला असून अनेकांकडून पैशांची उभारणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय पटेल यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कार्यक्रमस्थळावरून संस्थेचे नाव हटविण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काही सन्मानपत्रे आणि वृत्तपत्रांमधील प्रसिद्धींमध्ये पुन्हा संस्थेचे नाव आणि पदनाम वापरण्यात आले.



