नाशिक कृऊबा समितीच्या उपसभापतीपदी प्रल्हाद काकड बिनविरोध निवड.

नाशिकजनमत
:- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मखमलाबाद येथील संचालक प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रिक्त असलेले सभापती पद यासाठी एकच अर्ज दाखल झाला होता उपसभापती पदासाठी काल सकाळी कृउबा समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती पदासाठी संचालक प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, भास्कर गावित आदींची नावे चर्चेत होती. मात्र उपसभापती पदाच्या या निवडी संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पणन व सहकार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन झालेल्या चर्चेत एकमत झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती
पदासाठी प्रल्हाद काकड यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आल्याने ही निवड बिनविरोध झाली.
प्रल्हाद काकड यांची निवड होताच घोषणांचा जयघोष करीत आनंद साजरा केला. त्यानंतर
त्यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, टोपी देत सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती कल्पना चुंभळे, शिवाजी चुंभळे, जगन्नाथ कटाळे, राजाराम धनवटे, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, सविता तुंगार, धनाजी
पाटील, भास्कर गावीत, निवृत्ती बागूल, विनायक माळेकर, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, उत्तम खांडबहाले आदी बाजार समिती संचालक व शेतकरी तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रल्हाद काकडे यांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांनी आनंद उत्सव साजरा करत प्रल्हाद काकड यांचे अभिनंदन केलेले आहे

