ब्रेकिंग

येवला वन विभाग कार्यालयातील घटना.शेतकऱ्याकडून लाच घेताना आठ जणांना रंगेहाथ पकडले.

शेतकऱ्याकडून लाच घेताना आठ जणांना रंगेहाथ पकडले

 

 

नाशिक जनमत देशात भ्रष्टाचार कमी होत नसल्याचे दिसत आहे. टेबला खालून पैसा दिल्या सीवाय काम होत नाही. सागाचे झाड तोडण्याच्या परवानगीसाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या वन विभागाच्या येवला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांसह दोन खासगी व्यक्तींना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

 

तालुक्यातील दहेगाव पाटोदा, येथील एका तक्रारदार शेतकऱ्याने त्यांच्या शेत गट क्र. ६१ मधील दोन हेक्टर ४९ आर क्षेत्रातील सागाचे झाड तोडून विक्री करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला येथे परवान्यासाठी अर्ज केला होता. सदर परवानगी मिळवून देण्यासाठी संबंधितांनी १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. मंगळवारी, (दि. १९) सापळा रचून ‘एसीबी’ने कारवाई केली. त्यात पंकज नागपुरे

 

‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची येवल्यात कारवाई

 

यांनी भाऊसाहेब माळी यांच्यासाठी पाच हजार व स्वतःसाठी दोन हजार, प्रवीण भोसले याने एक हजार, आकाश कोळी याने एक हजार, विजय लोंढे याने एक हजार, रामनाथ भोरकडे याने लाचेसाठी प्रोत्साहन दिले. खासगी इसम निखील आरणे याने एक हजार व सुनील भुरूक याने पाचशे रुपये असे एकूण ११,५०० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून, शहर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे