वडिलांना भेटून वापस येणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू. विल्होळी आठवा मैल परिसरातील घटना.
नाशिक जनमत वडिलांची तब्येत बरी नव्हती वडिलांना भेटण्यासाठी जायचे होते. परंतु सुट्टी मिळत नव्हती अंबड येथील कंपनीत नाईट शिफ्ट लागली आणि आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पंढरीनाथ तरडे मुंडेगाव येथे गेले होते वापस येत असताना वेल्होळी जवळ अपघातामध्ये द त्यांचे निधन झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की
वडिलांना भेटण्यासाठी
मुंढेगाव येथे जाऊन पुन्हा अंबडला कंपनीत नाइट ड्युटीसाठी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री विल्होळी येथील आठवा मैल परिसरात घडली. पंढरीनाथ तारडे (वय ४८, रा. सिन्नर फाटा, नाशिक) असे मृताचे नाव आहे. तारडे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने मुंडेगाव येथे शोक कळा पसरली आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण वाढल्याचे सर्वत्र दिसत आहे.



