ब्रेकिंग

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मध्ये प्रथमच आढळला दहा दिवसाचा सफेद बिबट्या.

तीन पिल्लांमध्ये एक सफेद बिबट्याचे पिल्लू

 

नाशिक जनमत   काल दिंडोरी मध्ये उसाच्या शेतात एका बिबट मादिने तीन पिल्लांना जन्म दिला असून एकाचा रंग पूर्णपणे सफेद आहे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच सफेद बिबट्या निघाल्याचे वनाधिकारी सांगत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की

 

दिंडोरी तालुक्यात प्रथमच पांढऱ्या रंगाचा बिबट्याचा बछडा आढळल्याने वन विभागासह नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे. चाचडगाव शिवारात ऊसशेतीत नुकत्याच सापडलेल्या तीन नवजात बछड्यांपैकी एकाचा रंग चक्क पांढरा असल्याचे निदर्शनास आले. ही घटना नाशिक वन विभागासाठीही पहिल्यांदाच नोंदली गेली आहे.

दिंडोरी येथे उसाच्या शेतात बिबट्याचे नवजात पिल्ले  बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी देखील केली होती

ऊसतोड सुरू असताना शेतमजुरांना तीन बछडे आढळले. याबाबतची माहिती मिळताच दिंडोरी वन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिन्ही पिलांचे ‘रेस्क्यू’ केले. त्यापैकी एका बछड्याची त्वचा पांढरी असून, अंगावर हलके काळे ठिपके दिसत असल्याने अधिक तपासासाठी असताना

 

 

 

वन विभागाच्या विशेष पथकाला बोलावण्यात आले. पथकाने

 

 

बछड्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता ते अवघे दहा दिवसांचे असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी पथक पुन्हा शेतात पोहोचले. बछड्यांना टोपलीखाली सुरक्षित ठेवून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. रात्रीच्या वेळी मादी बिबट्या घटनास्थळी आली आणि तिन्ही बछड्यांना जबड्यात धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. ही संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान सफेद बिबट्या निघाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे