ब्रेकिंग

सिन्नर फाटा येथील वाहतुक कोडीची समस्या मिटणार.आमदार सुरोज आहिरे.

वाहतूक कोंडीमुळे अनेकदा झाले अपघात. आमदारांनी दखल घेतल्याने नागरिकांमध्ये आनंद

 

नाशिक जनमत  नाशिक पुणे रोडवरील सिन्नर फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते यामुळे वाहतूक नेहमी विस्कळीत होत असते हजारो वाहने या रस्त्याने एकदा करतात जवळच रेल्वे पूल असल्याने या पुलावरून अनेक वाहने नाशिक रोड कडे येतात तर काही वाहने नाशिक शहरात येतात महत्वपूर्ण असा हा रस्ता असल्याने सिन्नर फाटा येथे वाहतुकी च्या कोंडीची समस्या सकाळ संध्याकाळ नेहमीची झाली आहे देवळाली मतदारसंघाच्या आमदार सुरज अहिरे यांच्याकडे वाहनचालकांनी अनेकदा मागणी केली होती ही सिन्नर पार्टी फाटा येथील वाहतुकीची समस्या सोडावी. त्या अनुषाने काल

सिन्नर फाटा येथील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. आमदार सरोज आहिरे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

आमदार सरोज आहिरे यांच्या

मुख उपस्थितीत जिल्हाधिकारी

कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. अस्तित्वात असलेल्या पुलाला नव्याने पूल जोडून पुढे विस्तार करता येईल का, याबाबत तांत्रिक शक्यता तपासून त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत

प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली होती.

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून, येथे वारंवार वाहतूक कोंडी होते त्यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच आपत्कालीन सेवांना अडचणींचा सामना करावा आगामी सिंहस्थ लागतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक वाढण्याची

शक्यता लक्षात घेऊन या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

पोलिसांकडून माहिती सादर­

या बैठकीदरम्यान वाहतूक पोलिस शाखेच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर फाटा येथे नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते याबद्दल सविस्तर माहिती दिली. विविध दिशांनी होणारी वाहनांची गर्दी, रस्त्याची मर्यादित क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापनातील अडचणी या बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सरोज अहिरे यांच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश यावे व वाहतुकीची समस्य  कायमची सुटावी असे नाशिक जन्मत नागरिकांनी बोलून दाखवले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे