ब्रेकिंग

गिरीश महाजन पालिका आयुक्त मनीषा खत्री. महापौर हिंमगोरी आडके. यांचा रस्त्याची गुणवत्ता व कामकाज पाहण्यासाठी अचानक रात्री दौरा.

चांगल्या कामाच्या गुणवत्तेसाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

प्रतिनिधी | नाशिक जनमत

नाशिक शहरात लवकरच कुंभमेळा येत असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते पूल इत्यादी विकासाची कामे नाशिक शहरात चालू आहे. यामध्ये काँक्रिटीकरण इत्यादी कामे चांगले दर्जाची व्हावे यासाठी कुंभमेळा मंत्री नाशिक महानगरपालिका आयुक्त व महापौर उपमहापौर स्टॅंडिंग सभापती यांचे प्रामुख्याने लक्ष असल्याचे काल दिसून आले. आडके

सिंहस्थ पार्श्वभूमीवर नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन आणि प्रशासन आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. कुंभमेळ्याच्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि.२६) नाशिक दौऱ्यावर असताना विकासकामांची अचानक पाहणी करत यंत्रणेची धावपळ उडवून दिली. रस्त्यांच्या कामात दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कुचराई करणाऱ्यांना सोडणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना तंबी दिली.

 

मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गरवारे पॉईंट ते अंबड लिंक रोड या मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली.

 

 

हा मार्ग त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य दुवा ठरणार आहे. त्यानंतर त्यांनी त्र्यंबक नाका परिसरातील जिल्हा रुग्णालयासमोरील व्हाइट टॉपिंग कामाचा आढावा घेतला. काँक्रिटीकरणासाठी वापरले जाणारे सिमेंट, खडी आणि इतर साहित्याचा दर्जा तपासण्याच्या सूचना त्यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांना दिल्या. यावेळी

 

महापौर हिमगौरीआडके. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह मनप आयुक्त मनीषा खत्री स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान होणाऱ्या विकास कामामुळे नागरिकांना दिवसा मोठा त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर दिवस रात्र करून ही कामे लवकरात लवकर करावी असे नागरिकांनी नाशिक  जन्मत कडे बोलून दाखवले. कामाची गुणवत्ता चांगली असावी हे रस्ते कायमस्वरूपी दीर्घकाळ टिकणारे असावे. कामाच्या गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असेही नागरिक यावेळेस बोलत होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे