भावनिक पत्राद्वारे महापौरांची नागरिकांना साद.
नाशिक शहराच्या विकासासाठी एकत्र या..हिमगौरी आडके.

नाशिककरांनो, शहराच्या विकासासाठी एकत्र या !
भावनिक पत्राद्वारे महापौरांची नागरिकांन
नाशिक जन्मत नाशिक शहराची ओळख एक धार्मिक शहर कुंभमेळ्याचे शहर प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले भूमी. मुबलक पाणी आणि स्वच्छ वातावरण शिक्षणाची पंढरी इत्यादी उपमा दिल्या तरी कमी पडतील असे असून गेल्या काही दिवसात वाढलेली गुन्हेगारी भोंदू अशोक खरात. इत्यादी प्रकरणामुळे नाशिकचे नाव खराब होत आहे. अशोक खरात प्रकरण पूर्ण देशातच गाजत आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवर कोट्यावधी भावीक नाशिक शहरात येणारा असून त्यांची सुरक्षा व शहराच्या विकासासाठी एकत्र या असा भावनिक सल्ला नाशिककरांना पत्राद्वारे महापौर हिंमगोरी आडके यानी दिला आहें.आहे
रामनवमी, रामरथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी नाशिककरांशी
भावनिक पत्राच्या माध्यमातून संवाद साधत शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘नाशिक हे केवळ शहर नसून, आपले कुटुंब आहे,’ अशी भावना व्यक्त करीत महिला सक्षमीकरण, स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सहभागावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अलीकडील काही घटनांमुळे शहराची प्रतिमा मलीन झाल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच,
महिलांनी स्वतःची सुरक्षितता जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
महापौर
आहेर-आडके यांनी नाशिककरांना दुसरे पत्र लिहित गेल्या महिन्यात शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम,
विकासकामांची सुरुवात; तसेच गोदावरी नदी स्वच्छता मोहिमेचा विशेष उल्लेख केला आहे. ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती नसून श्रद्धा आणि जबाबदारीचा भाग असल्याचे महापौरांनी नमूद केले. महिला दिनानिमित्त घरपट्टी सवलतीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करीत नागरिकांनी कर वेळेत भरावा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘प्रत्येक रुपया नाशिकच्या
विकासासाठी वापरला जाणार आहे,’ असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘हरित. कुंभ’ ही संकल्पना मांडत शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे महापौरांनी सांगितले. इंदूर महापालिकेचे उदाहरण देत, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच शहराचा विकास शक्य होतो, पुढील काळात नाशिकची ओळख हरित नाशिक सुंदर नाशिक अशी होणार असून प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावले व त्याचे चांगले संगोपन केले तर ते उद्या नाशिकची ओळख होईल. महिलांनी भोंदू बाबा पासून दूर राहावे आपली सुरक्षितता बाळगावी असे त्यांनी म्हटले आहे.



