गुन्हेगारी

मिरगावकरांची मागणी भोंदूबाबा खरातला फाशीची शिक्षा द्या!

भोंदूबाबा खरातला फाशीची शिक्षा द्या!

 नाशिक जनमत    सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचे अध्यक्ष अशोक खरात यांनी मी गावातील नागरिकांना नेहमी दादागिरी दमदाटी देऊन धमकवल्याचे प्रकार घडले होते. काही जणांना जेलमध्ये देखील जावे लागले होते. राजकारणी पुढारी लोकांबरोबर चर्चा असलेली ओळख यामुळे जो गावावर गावातील नागरिकांवर अन्याय करत असल्याचे गावातील नाव नागरिक बोलत आहेत. दरम्यान अशोक खरात भोदू बाबा महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात पूर्णपणे अडकला आहे  व त्यामुळे मिरगावचे नाव बदनाम झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभा घेऊन कॅप्टन खरातचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला गावातून बहिष्कृत करण्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.

योजनांवर डल्ला ?

येथील हिंगे वस्तीसाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी ईशान्येश्वर मंदिराजवळ उभारल्याने त्या भागातील नागरिक पाण्यापासून वंचित पहिला आरोप करण्यात आला.

गावात कोणीही जमीन विक्रीस काढली, तर कॅप्टन खरात ती वाढीव दराने स्वतःच खरेदी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिकांना हक्क असूनही जमिनी घेता येत नसल्याचे सांगण्यात आले. काही नागरिकांना धाक दाखवणे, गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचाही आरोप करण्यात

आले आहें

 राजकीय पुढार्‍यांना आताशी धरून अशोक खरात यांनी गावातील नागरिकांना मिळणारे पाणी ईशानेश्वर मंदिरासाठी वाढविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अशोक खरात ने गावाचे नाव खराब केले असून त्यास सरकारने फाशीची शिक्षा देण्याची मागणी अनेक नागरिकांनी केले आहे.

‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरात याच्यासाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्या वेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे