ब्रेकिंग
नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर; ३ कोटींची फसवणूक.
गिरीश महाजन चे कारवाईचे आदेश.

नाशिक जनमत नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर; ३ कोटींची फसवणूक
, दोघांना जळगावहून अटक करण्यात आली आहे.गोदावरी काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून मोठी आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट समोर आले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा मंत्री गिरीश महाजन यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध


नाही. यापूर्वी देखील त्यांनी जामनेर मध्ये असेच लोकांची फसवणूक केलेली आहे. नशेच्या आहारी गेलेले असून त्यांना दारूचे व्यसन जडलेलं आहे. त्यांच्या या उद्योगामुळे सदर तरुणांचे कुटुंबिय देखील त्यांनी रस्तावर आणलेले आहे, शेतजमीन विकावी लागलेली आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे यापूर्वीच निर्देश पोलीस विभागाला दिले आहेत. :- मंत्री गिरीश महाजन


