ब्रेकिंग

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये* *जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

*नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के*

 

*नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये*

 

*जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

 

नाशिक, दिनांक 8 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड तालुक्यातील काही ठिकाणी

आज सुमारे 10 वाजून 1 मिनिटांनी भूकंपचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नागरिकांनी अजिबात घाबरू नका, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वांनी फक्त सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहेत.

 

त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहेत की, सतर्क राहण्यासाठी आपण ज्या बिल्डिंगमध्ये आहे, त्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची क्रॅक आली आहे का, किंवा कुठल्याही प्रकारची धोका आहे का, याचे एक निरीक्षण करा. जर कुठल्याही प्रकारची धोका असेल, तर स्थानिक प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत, किंवा महानगरपालिकेशी ताबडतोब संपर्क साधा. आणि त्या बिल्डिंगमध्ये अजिबात राहू नका. तसेच

कुठलाही जो लँडस्लाइड प्रोन एरियाज असेल, विशेषतः घाट परिसरमध्ये, ज्या ठिकाणी लँडस्लाइड होण्याची शक्यता असेल, त्या ठिकाणी जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक्स वगैरे पडून आहे की नाही, त्याच्याबद्दल एक निरीक्षण करा. दुसरी गोष्टी, त्या जमिनीखाली पाणी वाहतेय का, पाण्याचा आवाज येत आहे का, त्याचे आपण निरीक्षण करा. जर अशी परिस्थिती असेल, तर सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावे. त्याच्यासाठी स्थानिक प्रशासनाशी आपण संपर्क करा. प्रशासन पूर्णतः सतर्क आहे. कुठल्याही प्रकारची नुकसानची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली नाही. आपण सगळ्या ठिकाणी निरीक्षणचे आदेश दिलेले आहेत. सर्वांनी आपल्या आपल्या घराचे निरीक्षण करून घ्या, आणि कुठल्याही प्रकारचे धोकादायक परिस्थिती असेल, तर आपण आपले स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेशी ताबडतोब संपर्क साधावा.

घाबरण्याचे काही कारण नाही, परंतु सतर्क राहण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहेत.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे