अपघातात मृत्यु पावलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण*
पावसाने उघडीप दिल्याने युद्ध पातळीवर पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम चालू.

*
*अपघातात मृत्यु पावलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण*
नाशिक जन्मत मनपा हद्दीतील खड्ड्यांच्या अपघातात मृत्यु पावलेल्या ६ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे धनादेश महासभेत वितरित करण्यात आले.
नाशिक शहर व परिसरात खड्ड्यांच्या अपघातात ६ व्यक्तींचे निधन झाले.त्यांच्या वारसांना महासभेमध्ये

महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री ,मनपा गटनेते, पदाधिकारी व प्रभागातील नगरसेवक यांचे उपस्थितीत वारसांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
*तातडीची मदत/सहाय्यता*

१)स्व.जितेंद्रसिंग मंगलसिंग गिरासे यांची पत्नी तनुजाबाई जितेंद्रसिंग गिरासे,
२)स्व.प्रभाकर साहेबराव निकम यांची पत्नी श्रीमती कावेरी प्रभाकर निकम,

३)स्व.उज्वला शांताराम गायकवाड यांचे पती श्री.सिताराम बुधा गायकवाड, ४)स्व.दिपाली दिलीप बेळेयांचे पती श्री.दिलीप श्रीकृष्ण बेळे
५) स्व.निलेश प्रल्हाद कोतकर यांच्या पत्नी श्रीमती ज्योती निलेश कोतकर
६)श्री.मासुम भिकन शाह यांच्या पत्नी श्रीमती नसरीन मासुम शाह
प्रत्येकी पाच लाख रुपये मदत करण्यात आली


