ब्रेकिंग

जगाला हेवा वाटणारे नाशिक शहर येणाऱ्या काळात होणार. कुंभ नगरी सुवर्णनगरी म्हणून ओळख होणार.

नाशिक जनमत    यावर्षी सियास्त कुंभमेळ्याची कामे चालू असल्याने नाशिक शहरामध्ये शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात mngl गॅस कंपनी तर्फे पाईपलाईन होण्यासाठी खोदकामे केले  यामुळे अनेक जण जखमी झाले होते.

दरम्यान नाशिक शहरातील नागरिकांचा रोज पाहता नाशिक शहराचे प्रथम नागरिक महापौर हिमगोरे आडके. महानगरपालिका आयुक्त  मनीषा खत्री कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन. यांनी गेल्या आठ दिवसात पाऊस कमी झाल्याने स्वतः रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन नाशिक शहरातील 70 टक्के खड्डे बुजवले आहेत उर्वरित राहिलेले खड्डे देखील लवकरच बुजणार आहेत.

सलग जोरदार चालू असलेला पाऊस व नाशिक महानगरपालिकेच्या उशिरा झालेल्या निवडणुका यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर रस्त्याची कामे करताना वेळ कमी मिळाल्याने व लगेच पाऊस चालू झाल्याने नागरिकांचा रोश संताप  नाशिक महानगरपालिकेला सहन करावा लागला.

नाशिक महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष महापौर हिंमगोरी आडके. उपमहापौर विलास शिंदे. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः भर पावसात खड्डे असलेल्या मखमलाबाद सातपूर अंबड लीक रोड इत्यादी भागात रस्त्यावर उतरून बांधकाम अधीक्षक अग्रवाल व त्यांच्या संपूर्ण टीमला खड्डे बुजवण्याचे ताबडतोब आदेश दिले. यानंतर पंचवटी मखमलाबादचा अनेक भागातील खड्डे युद्ध पातळीवर बुजवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सुटकेचा निष्वास सोडला असला तरी. लवकरच शहरातील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी युद्ध पातळीवर तयार करण्यात आलेले आहे. पावसाने उघडीत दिली तर अतिशय चांगल्या दर्जाची रस्त्याच्या काँक्रीट करण्याची ही कामे होणार आहे.

नाशिक शहरात खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेले आहेत त्याचे सर्व दुःख आम्हाला असून कुंभमेळ्या निमित्त जवळपास दहा कोटी जनता भाविक नाशिक मध्ये येणार आहे त्यासाठी व शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी रिकामे देखील तेवढीच महत्त्वाची झालेले आहे. पुढील येणाऱ्या तीस चाळीस वर्षाच्या नाशिककरांच्या भविष्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन व रस्त्यांचे कॉन्टॅक्ट करण्याचे काम झाले तर नागरिकांना मुबलक पाणी व शहरातील दळणवळणासाठी चांगले रस्ते मिळणार आहे.

काम करण्यास मिळालेला अपुरा वेळ व त्याचा पावसाळा चालू झाल्याने. व एम एन जी गॅस कंपनीने केलेल्या खोदकामामुळे.  रस्त्यातील खड्ड्यांची परिस्थिती वाईट झाली होती. त्यामुळे नाशिककरांची दिलगिरी व्यक्त करत महापौरांनी लवकरच खड्डे व रस्त्याचे व शहराचे शोभे करण्याचे काम युद्ध पातळीवर चांगल्या दर्जाचे  होणार असून नाशिककरांनी संयम राखून प्रशासनाला साथ द्यावी.

दोन महिने पावसाळा संपत आला असून लवकरच शहराच्या विकासाची कामे पूर्ण करणार आहोत. द्वारका सर्कल या ठिकाणी वाहतूक चालू करण्यात आलेले आहे.

त्र्यंबक रोड येथे देखील काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे कामे झाले असून एकतर्फी रस्ता चालू केला आहे. काही ठिकाणी वाहतूकदार रस्त्यावर वाहण ओव्हरटेक करत तू तर्फे रस्ता अडवत असल्याने ट्राफिक जाम होत आहे

मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात ट्राफिक पोलीस वार्डन वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर कार्यरत आहे.

नाशिककरांनी आतापर्यंत दिलेली साथ पुढील काळासाठी द्यावी एक सुंदर जगाला हेवा वाटणारे शहर  नाशिककरांना दिसणार आहे.

 

बारा वर्षातून होणारा कुंभमेळा चांगल्या नियोजनानुसार होणार असून. देश विदेशातून भाविक येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी शहराच्या विकासाचे कामे चालू आहेत.

 

नाशिक शहर लवकरच खड्डे  मुक्त होणार  असल्याचे त्यांनी नाशिक जन्मत सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे