ब्रेकिंग

नाशिकमध्ये महावादनाचा जल्लोष; २५ ढोल पथकांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण दुमदुमले

नाशिकमध्ये महावादनाचा जल्लोष; २५ ढोल पथकांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण दुमदुमले

नाशिक : जनमत    नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे गुरु तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्ष निमित्त त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेले. शहरातील विविध भागांतील २५ ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार वादन सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने कलाकार प्रवीण तरटे उपस्थित होते. त्यांच्यासोबत नाशिकच्या महापौर हिमगौरी आडकेआहेर, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनिषा खत्री तसेच स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

 

 

तसेच नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदारडे, चंद्रशेखर जोशी, प्रफुल्ल संचेती व समितीचे सर्व सदस्य या कार्यक्रमात उपस्थित होते. सर्व ढोल पथकांनी सादर केलेल्या जोशपूर्ण वादनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा महावादन कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात उत्साहात पार पडला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे