ब्रेकिंग

पंचवटीतील विक्टोरिया पुलाखाली अज्ञात व्यक्तीचे गंगेत प्रेत

नाशिक जनमत    पंचवटीतील विक्टोरिया पुलाखाली काल संध्याकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका व्यक्तीचे प्रेत गंगेच्या पाण्यात पडल्याचे दिसून आले. दरम्यान यावेळी सदर मनुष्याचे फक्त वर मुंडके हे ठळकपणे दिसत नव्हते त्यामुळे नागरिकांमध्ये स भ्रम होता.

 

सदर घटना 112 वर कॉल करून पोलिसांना सांगितल्यावर घटनास्थळावर बऱ्याच वेळानंतर पोलीस आले यानंतर मनुष्य प्रेताप्रमाणे दिसणाऱ्या वस्तूला बाहेर काढण्याचे ठरवले. बऱ्याच वेळानंतर ती वस्तू बाहेर काढली असता अज्ञात व्यक्तीचे प्रेत मिळून आल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी की सन गायकवाड नासिक जन्मत बोलताना सांगितले

दरम्यान यावेळी विक्टोरिया पुलावरून मालेगाव स्टॅन्ड निमणी कडे जाणारे अनेक वाहनधारक गर्दी बघून पुलावर थांबून पाण्यातील पडलेल्या वस्तूकडे बघून विविध अंदाज बांधत होते. त्याच वेळेस पत्रकार चंद्रकांत धात्रक यांनी थांबून व्हिडिओ शूटिंग करून पाण्यात दिसणाऱ्या प्रेत सदृश्य वस्तू बद्दल 112 ला कॉल करून पोलिसांना माहिती दिली. अधिक तपास पंचवटी पोलीस  करत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे